भाषा निवडा:   English   |  मराठी

बुकिंगसाठी कॉल करा

+९१ ९११२०३६४६५, +९१ ९११२०३८४८५

अशी आहे चैतन्यसृष्टी

प्रत्येक पर्यटकाला कोकणच आकर्षण असत. आपल्यापैकी अनेकांनी या विस्मयजनक कोकणभूमीत फेरफटका मारलेला आहे. कोकणातील लोकजीवनाच वास्तववादी दर्शन घेण्यासाठी, दापोली तालुक्यातल्या लोकप्रिय "चैतन्यसृष्टीत" कृषि आरोग्य पर्यटनासाठी तुम्ही यायलाच हव. दापोली नजीकच्या लाडघर गावातली ही चैतन्यसृष्टी तुमच्या दोन दिवसांच्या वास्तव्यात कोकणातल्या वैशिष्टपूर्ण वाडी जीवनाचा खराखुरा अनुभव तुम्हाला देते. कोकणचा झपाट्याने वाढत चाललेल्या पर्यटन उद्योगांमध्ये चैतन्यसृष्टीचा देखील विस्तार होतो आहे.

विविध प्रकारची फळझाड, फूलझाड, औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड लावलेल्या ह्या चैतन्यसृष्टीन सहा एकर क्षेत्र व्यापल असून गर्द झाडीत लपलेल्या पाच आकर्षक कुटीरामध्ये निवास व्यवस्था आहे. त्यापैकी दोन कुटीर वातानुकुलित आहेत. शिवाय १५ व्यक्तिंची निवास व्यवस्था होईल असे स्वतंत्र शयनगृह आहे. तुमच्यासाठी शुद्ध शाकाहारी आणि अस्सल कोकणी खाद्य पदार्थ बनवण्याकरिता, स्वच्छ सुसज्ज स्वयंपाकघर असून हसत खेळत भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी नावीन्यपूर्ण बैठक व्यवस्था आहे.

चैतन्यसृष्टीत पदार्पण केल्या केल्या होणार श्री गणेशाच प्रसन्न दर्शन तुम्हाला आध्यात्मिक भावनेनं भरून टाकते. तुमच्या मन: शांतीची सुरूवात इथून होते. तुम्ही तुमची धावपळीची जीवनशैली, व्यवसायिक बैठका आणि तनावापासुन मुक्त होत जातात. इथल्या वास्तव्यात तुम्ही शांत निवांत बनता. तुमचा इथला प्रत्येक दिवस पक्षांची गाणी आणि किलबिलाटाणे सुरू होतो. हे पक्षी तुम्हाला जणू सुप्रभात म्हणून तुमच्या आनंदायी वास्तव्यविषयी आश्वस्त करतात. त्यानंतर रुचकर कोकणी नाष्टयाने तुमचा दिनक्रम सुरू होतो, तुम्हाला मस्का पाव आणि बटरचीही आठवण येत नाही.

ठिकाण

चैतन्यसृष्टी कृषि पर्यटन
मु. पोस्ट. लाडघर, तालुका: दापोली,
जिल्हा: रत्नागिरी. पिन : ४१५ ७१२
महाराष्ट्र, इंडिया.

Copyright @ 2013 All Rights Reserved. Chaitanya Srushti, Ladghar Sitemap

Design & Developed By