चैतन्य ऍग्रो फॅमिली रिसॉर्ट मधील सुविधा
सर्वप्रथम, चैतन्य ऍग्रो फॅमिली रिसॉर्ट मध्ये तुम्हाला स्वच्छ हवा आणि मनाला उल्लासित करणार वातावरण देते.
चैतन्य ऍग्रो फॅमिली रिसॉर्ट मधला तुमचा प्रत्येक दिवस पक्षांच्या मंजुळ गाण्यांनी सुरू होतो त्यांच्या आवाजाने सकाळच्या शांततेला छेद जातो. इथला तुमचा प्रत्येक क्षण मंद गार वार्याच्या आल्हाददायक स्पर्शान प्रफुल्लित होतो. तुमच्या सुटीच्या दिवसाच्या शुभारंभची ती नांदी असते. कोकणातल्या खेड्यामधली वैशिष्ठपूर्ण सर्वव्यापी शांतता अनुभवाल्यानंतर तुम्ही खर्या अर्थाने शहरातल्या बेमाफ गर्दीपासून दूर आल्याची जाणीव तुम्हाला होते. शांतता, मोहकता, आणि प्रसन्न निसर्गाने भारलेली चैतन्य ऍग्रो फॅमिली रिसॉर्ट तुमच्या स्वागताला उत्सुक आहे. श्री गणेशाच्या पवित्र सनिध्यामुळे इथल वातावरण अदभुत झाल आहे. इथली शांतता इतकी निरव आहे की झाडाच पान पडल तरी ती भंग पावते.इथ येणार्या प्रत्येक अभ्यागताच मन सर्वव्यापी हिरवाईत आणि लाल मातीत गुंतून जात.
स्वच्छ सूर्यप्रकाश आणि वृक्षाची सावली तसेच वातावरणाला औषधी व सुगंधी वनस्पतीचा दरवळ यांच्या सोबातीमुळे तुम्हाला तणावमुक्त जीवनाची सुरूवात करता येईल याची खात्री चैतन्य ऍग्रो फॅमिली रिसॉर्ट देते. पारंपारीक कोकणी पद्धतीने बनवलेल्या आणि वाढलेल्या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतल्याने तुमची भूक तर चाळवली जाईलच शिवाय त्यांची चव दीर्घकाळपर्यंत तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील. तुम्हाला खरी विश्रांती घ्यायची असेल आणि मन:शांती मिळवायची असेल, तर आमच्या परिसरातल्या बागामध्ये फिरा, वृक्षवल्लिनी वेढलेल्या खास कुतिरामध्ये रहा. इथ तुम्हाला निसर्गनिर्मित व मानवनिर्मित सुविधांचा सुरेख मेळ झालेला दिसेल. चैतन्य ऍग्रो फॅमिली रिसॉर्ट मधल्या वास्तव्याचा आनंद घेतानाच तुम्हाला शांतता आणि एकंताची प्रसन्न अनुभूती येईल.
याव्यतिरिक्त आमच्या इथ खालील सुविधा आहेत.
- निसर्गात वसलेले कुटीर
- पारंपरिक शाकाहारी कोकणी भोजन
- अखंड वीज पुरवठा
- २४ तास गरम पाणी
- इनडोर खेळ [ कॅरम, चेस, पत्ते]
- बीचपासून १ किलोमीटरच्या अंतरावरती
- वैद्यकीय सेवा
- प्रवास मार्गदर्शन, भाड्याने वाहनासाठी मदत
- सुरक्षित वाहन पार्किंग व्यवस्था
- फॅमिली आणि जोडप्यांसाठी उपलबद्ध
- मुलांना खेण्यासाठी आंगण
- उपाहारगृह
चैतन्य ऍग्रो फॅमिली रिसॉर्ट मधील नियोजित सुविधा
- तरण तलाव
- परिषद सभागृह [एल सी डी प्रोजेक्टर]
- मुलांना खेण्यासाठी क्रीडांगण
- आयुर्वैद्य आणि निसर्गोपचार केंद्र
जवळील पर्यटन स्थळे