बुकिंगसाठी चौकशी करा !
आमच्या संकेतस्थळावरती स्वागत
जिथं सर्वाच्च आनंद मिळतो, जिथं संस्कृती आणि परंपरा अबाधित आहे, जिथं शतकानुशतके निसर्गाचे वर्चस्व राहीले आहे, अस एखादे ठिकाण तुम्ही शोधताय का ? कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात दापोली जवळ लाडघरला असं ठिकाण आहे. नावाप्रमाणेच अनुभव देणारी आहे ही ' चैतन्य ऍग्रो फॅमिली रिसॉर्ट " ! गूढ वनौषधीसंपन्न सह्याद्रीच्या कुशीत आणि जागतिकीकरणापासून दूर ही सृष्टी आहे. नयनरम्य भूभागात शांततामय निवासासाठी इथ आकर्षक अशा पाच कुटीर आहेत आयुष्यभर स्मरणात राहील असा सुंदर जिवनानुभव इथ मिळतो. इथल्या साधेपणात जीवनाची समृद्धी गवसते. समृद्ध निसर्गाच्या सनिध्यात सहजतेचा सुवर्णानुभव देण्याची खात्री 'चैतन्य ऍग्रो फॅमिली रिसॉर्ट" तुम्हाला देते. नैसर्गिक आणि संवार्धीत यांच्या सह-अस्तित्वामुळे इथ कल्पनेपलीकडचा अनुभव देणारी ही एकमेव परिसंस्था आहे. पर्यावरणाशी प्रामाणिक मेळ साधणार्या ह्या सृष्टीत येऊन परमात्म्याच्या महानतेची ताकद अनुभवा.
कुटुंबीय किंवा सहकार्यांसोबत प्रवास करताना तुम्हाला किंचित विरूंगला हवासा वाटेल, थोडा बदल हवासा वाटेल; तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एखादा विशेष वाढदिवस साजरा करावासा वाटेल, किंवा प्रणयाराधनेसाठी तुम्ही एखादा निवांत स्थळाच्या शोधत असाल, तेव्हा आमच्या संकेत स्थळाला भेट देऊन थोडी मुशफिरी करा किंवा आमच्या प्रवास सहयोगींशी संपर्क साधा, आणि तुम्हाला एक चिरस्मरणीय प्रवासनुभव मिळवून देण्याच्या कामी आम्ही निश्चित मदत करू !
अधिक माहिती









